रोहित शर्मा मुंबईच्या ताफ्यात दाखल, Ultimate सुख म्हणत फ्रँचायझीकडून स्वागत

rohit sharma join mumbai indians

Rohit Sharma IPL 2024 | इंडियन प्रीमियर लीगचा १७ वा हंगाम २२ मार्च पासून सुरु होत आहे. त्याआधी मुंबईला ५ वेळा विजेतेपद पटकवून देणारा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवून आता आयपीएल २०२४ साठी मैदानावर उतरला आहे.

हार्दिकला मुंबईचे कर्णधारपद दिल्यानंतर रोहितच्या आगमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, त्याचा सध्या मैदानात सराव करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा १८ मार्चला एमआय टीमच्या हॉटेलमध्ये पोहचला, त्यानंतर त्याने प्रॅक्टिस सुद्धा सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘वो आ गया, रो आ गया.’ ज्यामध्ये रोहित शर्माच्या एंट्रीचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

rohit sharma join mumbai indians

या व्हिडीओला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच रोहित शर्माचा सराव करतानाचा व्हिडीओ सुद्धा मुंबई इंडियन्सच्या सोशल अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो जबरदस्त शॉट्स मारताना दिसत आहे.

रोहित शर्मा हा फक्त फ्रँचायझीचाच नव्हे तर लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने एक दशक फ्रँचायझीचे नेतृत्व केले. त्याने २०१३ ला कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने पहिली ट्रॉफी जिंकली. त्यानंतर तो संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवण्यात यशस्वी झाला. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले आहे.

हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यानंतर चाहते नाराज आहेत परंतु हार्दिक पांड्याने सुद्धा आपल्या कर्णधार म्हणून पदार्पणाच्या वर्षीचं गुजरात टायटन्सला ट्रॉफी मिळवून दिली आणि दुसऱ्या वर्षी संघाला फायनलपर्यंत पोहचवण्यात तो यशस्वी ठरला. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्ससोबत खेळणार आहे.

Ultimate सुख म्हणत फ्रँचायझीकडून स्वागत

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.