मोठी बातमी! IPL 2024 पुर्वी RCB चे नाव बदललं, जर्सी आणि लोगोतही मोठा बदल

IPL 2024 RCB logo and name changed

RCB IPL 2024 चा १७ वा हंगाम सुरु होण्यास दोनच दिवस राहिलेत, त्यापुर्वी आयपीएल चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने आपल्या नावामध्ये मोठा बदल केला असून आता RCB चे नाव रॉयल चॅलेंजर बंगळुरू असं असणार आहे.

याआधी बेंगलोर शहराचे नाव बंगळूरु करण्यात आलं होतं. शहराचे नाव बंगळूरु आणि संघाचे नाव बॅंगलोर यामुळे चाहत्यांमध्ये संघाच्या नावावरुन गोंधळ उडाला होता, त्यामुळे आरसीबीच्या नावात बदल करण्यात आला आहे.

२०१४ मध्ये बॅंगलोर शहराचं नाव बदलून बंगळुरू असं करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच आरसीबीच्या बंगळुरूमधील चाहत्यांची नाव बदलण्याची मागणी होती, परंतु तेव्हा RCB ने आपल्या नावात कोणताही बदल केला नव्हता. आता दहा वर्षांनी राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोरनेही नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने नावाबरोबरच आपल्या जर्सीमध्ये सुद्धा बदल केला आहे.

IPL 2024 RCB logo and name changed

मंगळवारी (१९ मार्च) पत्रकार परिषद घेत RCB ने लोगो आणि जर्सीचे अनावरण केले आहे. यावेळी कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहली देखील उपस्थित होते. आरसीबीच्या सोशल मिडीया आकाऊंटवर आरसीबीच्या नव्या नावाचा आणि नविन जर्सी घातलेल्या टीमचा फोटो शेअर करण्यात आला आहे. ड्युप्लेसिसने अनावरणानंतर डीजे एलन वॉकरला आरसीबीची नवी जर्सी दिली.

Royal Challengers Bangalore is now Royal Challengers Bengaluru

आरसीबी संघाला १६ वर्षांच्या इतिहासात एकदाही आयपीएल ट्राॅफीवर आपल नाव कोरता आलेल नाही. आरसीबी आपला पहिला सामना सीएसकेविरुद्ध २२ मार्चला एम. ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे खेळणार आहे.

डब्लूपीएलमध्ये आरसीबीच्या महिला संघाने विजेतेपद जिंकल्यानंतर चाहत्यांना आता आरसीबी संघाकडूनही विजेतेपदाच्या आशा लागल्या आहेत. या हंगामामध्ये संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या