Share

वसंत मोरे शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल; पक्ष प्रवेश करणार का? याकडे लक्ष

Vasant More । Sharad Pawar । मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आज शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. वसंत मोरे हे पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. पवारांना भेटीला आल्यानंतर मोरे म्हणाले की, “मी फक्त शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी अजून काहीच सांगू शकत नाही. मला … Read more

Published On: 

Vasant More । Sharad Pawar । मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आज शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. वसंत मोरे हे पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.

पवारांना भेटीला आल्यानंतर मोरे म्हणाले की, “मी फक्त शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी अजून काहीच सांगू शकत नाही. मला फक्त भेटण्यासाठी बोलावलं आहे. माझ्याकडे जे विषय आहेत, ते मी शरद पवार यांना दाखवण्यासाठी आलो आहे. ते विषय दाखवल्यानंतर मी जाताना सविस्तर सांगेल. शरद पवार गटाच्या कार्यालयात आलोय. कार्यालयात माणूस भेटण्यासाठी देखील येतो”, असं वसंत मोरे म्हणाले.

वसंत मोरे यांना पत्रकारांनी आज शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न केला. त्यावर मोरे म्हणाले, “माझा पक्षप्रवेश नाही. मी खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांना भेटायला आलो आहे. मी लपवणार नाही. आता निवडणुका आहेत. मी निवडणूक लढवू इच्छूक आहे. शरद पवारांनी बोलावलं म्हणून मी आलो.

माझा आज पक्षप्रवेश नाही. निवडणुका लागू द्या. अजून निवडणूक लागलेली नाही. आता पुण्याचं मैदान मारायचं आहे म्हणून आलेलो आहे. पण अजून त्याबाबतीत कोणतीही चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही