…त्यांची लायकी काय? अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाने दंड थोपटले

Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group

Vijay Shivtare VS Ajit Pawar ।  २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.  शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांवर तोफ डागत बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर आता शिवसेना – राष्ट्रवादीत जुंपली आहे.

अजित पवारांसाठी बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष आहे. अश्यातच शिंदे गटाकडून अजित पवारांना विरोध होताना दिसून येत आहे.

बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि अजित पवार ( Ajit Pawar ) गटात ठिणगी पडली आहे. सासवडमध्ये पत्रकार परिषद घेत शिवतारेंनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत नीच, उर्मट म्हणाले आहेत.

Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group

याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपेंनी उत्तर देत म्हणाले,” एकीकडे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आम्हाला मान्य नाही म्हणायचं. दुसरीकडे सुनेत्रा पवारांचं सामाजिक कार्य काय, असे प्रश्न विचारायचे. मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेनंदेखील हाच प्रश्न विचारायला हवा होता की श्रीकांत शिंदे यांचं योगदान काय, असा सवाल परांजपेंनी केला.

परिवारवाद बस झाला, असं शिवतारे म्हणतात. पवार विरुद्ध पवार नको अशी त्यांची भूमिका आहे. मग ठाण्यातील लोकांनीदेखील अशीच भूमिका घ्यायची का? ठाण्यातील शिंदेशाही संपवायची का, असा प्रश्न ठाण्यातील जनतादेखील विचारु शकते, असं परांजपे म्हणाले.

यावर परांजपेंच्या प्रश्नावर विजय शिवतारेंना विचारले असता त्यांनी परांजपे यांची काय लायकी आहे ते सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत शिवतारेंनी पलटवार केला.

अजित पवारांना बारामती लोकसभा निवडणूक २०२४ सोपी जाईल असे दिसत नाही. अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, राहुल कुल, संजय जगताप आणि चुलते शरद पवार असणार आहे.

आघाडी धर्म-युती धर्म या बोलायच्या गोष्टी असतात, पाळायच्या नसतात, हे या आधी राजकारण्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झालंय. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची असेल. ही निवडणूक काटे की टक्कर सोबत एकमेकांचा काटा काढण्याची पण असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.