अजित पवारांचा माज गेलेला नाही; पवार नीच, उर्मट म्हणत शिंदे गटाचा हल्लाबोल

Vijay Shivtare will be an independent candidate for the Baramati Lok Sabha

Vijay Shivtare VS Ajit Pawar ।  २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत नाराजीनाट्य रंगले आहे. भाजप कडून शिंदे गट आणि अजित पवार गटाला डावलण्यात येत आहे. भाजपकडून जागावाटपात शिंदे गटाला १३ तर अजित पवार गटाला ४ जागा देण्यावर एकमत झाले आहे.

अश्यातच लोकसभेची खरी रंगत हि बारामती लोकसभा निवणुकीत येणार आहे. महा युती कडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra pawar ) तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.

दरम्यान शिंदे गटाकडून अजित पवार यांना विरोध होतांना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला आहे. त्यांनी अजित पवारांविरोधात बारामतीत शड्डू ठोकत, हल्लाबोल केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि अजित पवार ( Ajit Pawar ) गटात ठिणगी पडणार आहे.

अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही, जनतेलाही ते आवडत नाहीत. त्यामुळे शप्पत घेऊन सांगतो बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाही अशा शब्दांत शिवतारे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. तू कसा निवडून येतो बघतोच असा दम गेल्या निवडणुकीत अजित पवारांनी शिवतारे यांना भरला होता.

गावातील लोक अजित पवारांच्या विरोधात आहेत. अजित पवार काहीही करु देत ते जिंकू शकणार नाहीत. अजित पवार न जिंकण्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला उर्मटपणा आहे. त्याच्याविरोधात सामान्य जनता आहे, असं शिवतारे म्हणाले.

‘महायुती झाल्यानंतर मी त्यांना मी माफ केले होते. अजित पवारांना फुलांचा गुच्छ घेऊन गेलो.  मात्र त्यांनी माझ्याकडे लक्षही दिलं नाही. त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. त्यावेळी माझा जिल्हाप्रमुख म्हणाला की बापू याला धडा शिकवला पाहिजे. या अजित पवारांचा माज गेलेला दिसत नाही’, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवारांवर केला आहे.

Vijay Shivtare VS Ajit Pawar Baramati Lok Sabha

शिवतारे म्हणाले की, तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रात मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, पाडतोच. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव प्रवृत्ती असावी. गाव बसवायला अनेक लोक लागतात, गाव पेटवायला नालायक माणूस लागतो.

लोकसभेला सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत. पण अजित पवार उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करु असे लोक म्हणायला लागले. एका बाजूला एक लांडगा आहे आणि एक वाघ आहे तर कुठेतरी जावंच लागेल. त्यापेक्षा सुप्रिया सुळेंना मत देऊ अशी लोकांची भावना आहे. बारामतीत 6, 80,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे, पण 5 लाख 80 हजार मतदान हे पवारांच्या विरोधात आहे.

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे

पुढे बोलतांना शिवतारे म्हणाले की, मी महायुतीच्या विरोधात नाही. शंभर टक्के मी महायुतीचा शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे. एक तर आपल्याकडे ब्रह्मराक्षस आहे. लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा नव्हती लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी बारामती लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. बारामतीतील ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ.

अजित पवारांना बारामती लोकसभा निवडणूक सोपी जाईल असे दिसत नाही. अजित पवारांचे सर्व लक्ष बालेकिल्ला राखण्यात जाणार आहे. त्यामुळे इतरत्र अजित पवारांचे लक्ष कमी असणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, राहुल कुल, संजय जगताप आणि चुलते शरद पवार असणार आहे.

आघाडी धर्म-युती धर्म या बोलायच्या गोष्टी असतात, पाळायच्या नसतात, हे या आधी राजकारण्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झालंय. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची असेल. ही निवडणूक काटे की टक्कर असेल आणि एकमेकांचा काटा काढण्याची पण असेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.