अजित पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांकडे परतणार

Lok Sabha Election, अजित पवार, Ajit Pawar, Rohit Pawar, Sharad Pawar

Rohit Pawar On Ajit Pawar | २०१९ च्या लोकसभा जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार गटात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनाही भाजपने कमी जागा देणार असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीत यामुळे नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. भाजपकडून जागावाटपात सन्मानजनक वाटा मिळण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे आणि राष्ट्रवादी अजित पवार ( Ajit Pawar NCP ) गट अद्यापही ठामच आहे.

भाजप ३१ – शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ या फॅार्म्युलावर एकमत होण्याची शक्यता आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप 23, शिवसेना 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागेवर विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या विजयी ५ जागा कमी होणार आहेत.

अजित पवार गटाला ९ जागा अपेक्षित होत्या पण पदरात फक्त ४ जागा पडणार असल्याचे चित्र आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर तोंड सुख घेत आहेत.

NCP 22 MLA return to Sharad Pawar’s camp: Rohit Pawar

दरम्यान, रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, “अजित पवार गटाचे 22 आमदारांना शरद पवारांकडे (Sharad Pawar) परत यायचं आहे. तर, 12 आमदारांना भाजपच्या (BJP) चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असे वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलतांना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, “दादांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं, एक मोठा नेता, लोकांच्या मनातील लोकमत असलेला हा कुठेतरी भाजपने राजकीय दृष्ट्या संपवलं आहे. कारण भाजप नेत्याला जवळ करतो आणि संपवून टाकतो. राजकीय पक्षांना जवळ करतो आणि संपवून टाकतो. पण ते एवढ्या लवकर होईल हे माहीत नव्हतं.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना (Ajit Pawar) ९ जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु ९ ऐवजी आता त्यांना ४ वरच आनंद साजरा करावा लागणार आहे. लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही. सर्वच भाजपच्या पक्षाकडून उभे राहतील. त्यामुळे अजित पवारांचे 12 अशी लोकं आहेत जे अजित दादांनी भाजपमध्ये जावं असं सांगत असल्याचे” रोहित पवार (Rohit Pawar )म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.