Share

Sambhajiraje Chhatrapati | छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करा – संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. त्यांच्या या विधानानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण … Read more

Published On: 

Sambhajiraje Chhatrapati | टीम महाराष्ट्र देशा: आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

त्यांच्या या विधानानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Remove Chhagan Bhujbal from the post of minister – Sambhajiraje Chhatrapati

ट्विट करत संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati )  म्हणाले, “सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.”

“छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत”, असही त्यांनी ( Sambhajiraje Chhatrapati ) म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही