Share

Manoj Jarange | मराठा नेते लय नमुनेबाज, ते ओबीसी नेत्यांना काय सुधारू द्यायचे – मनोज जरांगे

🕒 1 min read Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला. तुम्ही छगन भुजबळ यांना पाडलं तर आम्ही मराठा नेत्यांना पाडू, असं ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे. पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला.

तुम्ही छगन भुजबळ यांना पाडलं तर आम्ही मराठा नेत्यांना पाडू, असं ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे. पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा नेते लय नमुनेबाज, ते ओबीसी नेत्यांना काय सुधारू द्यायचे, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “छगन भुजबळ यांना पाडू असं मी कधी म्हणालो आहे? तुम्ही आमच्या नेत्यांना पडणार का? आमचे नेते पडत नसतात.

आमचे नमुनेबाज नेते चांगल्या चांगल्या नमुन्यांना पाडतील. मराठा नेते लय नमुनेबाज, ते ओबीसी नेत्यांना काय सुधारू द्यायचे. तुम्ही मराठा नेत्यांना पाडायला गेला तर ते तुम्हाला काही सुधरू देणार नाही. 70 वर्षापासून ते आम्हाला सुधरू देत नाहीये. आम्हाला साथ द्यायला तयार नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना पाडू शकत नाही.”

Marathas have been deprived of reservation for 70 years – Manoj Jarange 

ओबीसी मेळाव्यात बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) लेकरं-लेकरं म्हणतात पण मग ओबीसीचे बकरे आहेत का? असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “70 वर्षापासून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे.

त्यामुळे मी ( Manoj Jarange ) मराठा समाजाची गोरगरीब लेकरं म्हणतो. मी त्यांच्या लेकरांबद्दल कधीच वाईट बोललो नाही. त्यांना मिळालाच पाहिजे, असं मी सातत्याने म्हणत असतो. बकरं वगैरे म्हणून मराठ्यांच्या मुलांना बोलू नका.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही