Share

Manoj Jarange | 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर काय करणार? मनोज जरांगे म्हणतात…

🕒 1 min readManoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी लढत आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीदरम्यान राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे.Related News for You‘लाडकी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी लढत आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

या मुदतीदरम्यान राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे.

परंतु, यादरम्यान जर सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करू, असा इशारा देखील जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange commented on Maratha reservation

आज प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईमध्ये जाऊ आणि आम्ही आमच्या न्यायासाठी लढू.

राज्य सरकारने जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर 25 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक होईल. पुढे काय करायचं? याबाबत या बैठकीत निर्णय होईल.

आम्ही अचानक मुंबईला जाणार नाही. राज्यातील मराठा समाजाचा विचार करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. 24 डिसेंबर पर्यंत सरकार काय करतं बघूया.”

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “आतापर्यंत जे जे सत्तेत आले आहे, त्यांनी जाणून-बुजून षडयंत्र रचून मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण दाबून ठेवलं.

70 वर्षापासून सगळे मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळ करत आहे. 70 वर्षापासून मराठा समाज ओबीसीत असताना त्यांना त्यांचं  आरक्षण मिळालं नाही.

मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यायचे नाही, असं सत्ताधाऱ्यांचं स्वप्नच होतं. मात्र, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सरकारला मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागत आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!