Share

Chitra Wagh | सध्या संजय राऊतांची अवस्था म्हणजे ‘बडा घर, पोकळ वासा’ – चित्रा वाघ

🕒 1 min readChitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकाच्या इंडिया आघाडीवर खोचक शब्दात टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाहांवर निशाणा साधला होता. अमित शाह यांना इंडिया आघाडीची चिंता करायची गरज नाही.Related News for Youराष्ट्रवादीत खडाजंगी, पण रात्री उशिरा छगन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकाच्या इंडिया आघाडीवर खोचक शब्दात टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाहांवर निशाणा साधला होता. अमित शाह यांना इंडिया आघाडीची चिंता करायची गरज नाही.

त्यांनी त्यांच्या घरात बघावं, आमच्या घरात डोकावण्याची गरज नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शाहांना धारेवर धरलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP’s house is strong – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “सर्वज्ञानी महाशय संजय राऊत, गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर’ ही तुमच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षांची जी अवस्था आहे, त्यावरूनच नितीशकुमारांनी तुमची कानउघाडणी केलीय.

जनाधारासाठी चाचपडणारे काही पक्ष आता मोठेपणाचा आव आणत INDI अलायन्सचं तुणतुणं वाजवताहेत. पण, ‘बडा घर, पोकळ वासा’ यापलीकडे तुमची वेगळी अवस्था नाही.

त्यात उबाठा गटाच्या घराचे वासे तर पार मोडकळीला आलेत. त्यामुळे भाजपच्या भक्कम घरात डोकावण्याचा आचरटपणा करण्याऐवजी आपल्या राहत्या घराचं छप्पर कधी कोसळून पडेल, याचा अंदाज घेत चला सर्वज्ञानी राऊतजी! भाजपचं घर मजबूत आहे म्हणून तर भारतीय जनतेने देशाची जबाबदारी आमच्या खांद्यांवर दिलीय.”

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. ते म्हणाले, “पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या नंतर पुन्हा एकदा इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये आम्ही राष्ट्रीय स्तरावरील जागावाटपाचा प्रश्न सोडवणार आहोत. त्यामुळे आमच्या या आघाडीची चिंता करायची गरज नाही. त्यांना आमच्या घरात डोकावण्याची गरज नाही, त्यांनी त्यांच्या घरात बघायला हवं. 2024 मध्ये इंडिया आघाडीचाचं विजय होईल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!