🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला 40 दिवसांचा कालावधी दिला होता.
काल (24 ऑक्टोबर) ही मुदत संपलेली असून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना विनंती केली आहे.
मराठ्यांना टिकणारा आरक्षण हवं असेल तर राज्य शासनाला थोडा वेळ दिला पाहिजे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
Shambhuraj Desai commented on Maratha Reservation
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai commented on Maratha Reservation) म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत सर्वांनी कायदेशीर बाजू समजून घ्यायला हवी. दीड वर्ष हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकलं होतं.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी लक्ष देऊन, हे काम केलं होतं. अत्यंत बारकाईने त्यांनी ते केलं होतं. कायदेशीर गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो.
काल मनोज जरांगे यांनी दिलेली मुदत संपली आहे. मात्र त्याआधीपासूनच मी त्यांना विनंती करत आहे की कायमस्वरूपी मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर त्यांनी राज्य शासनाला थोडा वेळ द्यावा. मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला थोडा वेळ दिलाच पाहिजे.”
Sanjay Shirsat commented on Manoj Jarange
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागे अदृश्य शक्ती असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या मुद्द्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या मागे काही अदृश्य शक्ती वगैरे नाही. जरांगे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते असून ते त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत आहे.
परंतु, काही राजकीय भोंगे त्यांच्या आंदोलनावरून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. काही लोक त्यांच्या आंदोलनाचा फायदा घेत आहे. मात्र, जरांगे यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या मागे अदृश्य शक्ती? संजय शिरसाट म्हणतात…
- Sambhajiraje Chhatrapati | मनोज जरांगेंनी उपोषण करावं, पण किमान पाणी तरी प्यावं – संभाजीराजे छत्रपती
- Manoj Jarange | मराठा समाज माझा माय बाप, मी खोटं बोलणार नाही – मनोज जरांगे
- Maratha Reservation | मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही; मनोज जरांगेंनी गिरीश महाजनांना झापं झापं झापलं
- Manoj Jarange | CM शिंदेंना आरक्षण द्यायचं आहे, मात्र ते आरक्षण देऊ देत नाही; मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











