Govt Job Opportunity | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून बेरोजगार आणि पात्र तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून बेरोजगार आणि पात्र तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांनी अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 22, तारतंत्री (वायरमन) 22 आणि कोपा 13 जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी 18 ते 38 वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तर भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वर्धा जिल्ह्यात नोकरी करावी लागणार आहे.

राज्य शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला  भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.apprenticeshipindia.gov.in/

या भरती (Bank Job) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1c5o5mCAjCbkU2jDYsXA8Uow3qSTfPjtZ/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.mahadiscom.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही