Share

Yashomati Thakur | पीओ बियर, करो सरकार को चिअर; यशोमती ठाकूर यांची राज्य सरकारवर खोचक टीका

Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बियर विक्रीत घट झाल्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. बिअरच्या व्यापाराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने बिअर उत्पादन शुल्कात कपात करण्याचा विचार केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार … Read more

Published On: 

Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बियर विक्रीत घट झाल्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे.

बिअरच्या व्यापाराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने बिअर उत्पादन शुल्कात कपात करण्याचा विचार केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे, असं यशोमती यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

The government seems to be pouring beer on de-addiction awareness – Yashomati Thakur

ट्विट करत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, “महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.

या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे…!

रेशनवर बियर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतनार वाटतं सरकार…

जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे. पिओ बियर….करो सरकार को चिअर.”

दरम्यान, बियर उद्योगाशी संलग्न असलेल्या लोकांनी राज्य सरकारकडे बियरवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. अल्कोहोल सामग्रीच्या आधारे तुलना केल्यास बियरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मध्यांपेक्षा जास्त कसा आहे? हे त्यांनी सरकार समोर स्पष्ट केलं.

त्याचबरोबर ज्या राज्यांनी बियर वरील उत्पादन शुल्क कमी केला आहे, त्यांना महसूल वाढीच्या दृष्टीने फायदा झाला असल्याचं देखील बियर उद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांनी राज्य सरकारला सांगितलं आहे. त्यानंतर सरकारने समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही