Share

Supriya Sule | सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळे म्हणतात…

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गट येत्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर शरद पवार गटाच्या … Read more

Published On: 

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गट येत्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I have not seen Sunetra Pawar’s banner – Supriya Sule

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावले होते.

या बॅनर्सवर संसदेचा फोटो झळकला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सुनेत्रा पवार यांचे बॅनर मी पाहिले नाही. त्यामुळे मला याबद्दल काहीच माहित नाही.”

ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, “ड्रग्सच्या प्रकरणामध्ये कुणीही कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी या मुद्द्यावरील पत्रकार परिषद बघितली.

या प्रकरणामध्ये त्यांना भाषण करण्यापेक्षा ॲक्शन घेण्याची गरज आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आम्ही ड्रग्स या विरोधात आहोत, अशी महाराष्ट्राने देशाला दिशा द्यायला हवी.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही