🕒 1 min read
MLA Disqualification | मुंबई: शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी दिवसेंदिवस लांबत चालली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलं सुनावल देखील होतं.
त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे. अशात या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 13 ऑक्टोबर रोजी शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडून या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
The hearing of disqualified MLAs will be held on October 12
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification) सुनावणी वेळापत्रकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बदल केला आहे.
13 ऑक्टोबर रोजी होणारी ही सुनावणी आता उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या दुपारी 02 वाजता ही सुनावली पार पडणार आहे.
सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या, या ठाकरे गटाच्या मागणीमुळे विधानसभा अध्यक्षांनी हा बदल केला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षभरापूर्वी काही आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
या सर्व घटनानंतर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या विरोधात आमदार अपात्रतेची (MLA Disqualification) याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेत हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं. त्यानंतर ही सुनावणी सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मिंधे-पवार गटाने देणाऱ्याचे हात घेतले व देणाऱ्यांना हुकूमशहा ठरवले; ठाकरे गटाची टीका
- Weather Update | ‘या’ ठिकाणी कोसळणार परतीचा पाऊस, हवामान खात्याने दिला अंदाज
- Vijay Wadettiwar | पुण्यातील ससून रुग्णालय म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा – विजय वडेट्टीवार
- Chitra Wagh | ये डर अच्छा है; ‘त्या’ मुद्द्यावरून चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबरपूर्वी करा ‘ही’ काम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











