Share

Amol Kolhe | सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या सरकारकडून सूडबुद्धीने माध्यमांचा गळा घोटला जातोय – अमोल कोल्हे

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मराठी वृत्तवाहिनी लोकशाहीने हा व्हिडिओ प्रसारित केला होता. किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. काल (22 सप्टेंबर) संध्याकाळी 7 वाजेपासून पुढील 72 तास लोकशाही … Read more

Published On: 

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

मराठी वृत्तवाहिनी लोकशाहीने हा व्हिडिओ प्रसारित केला होता. किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे.

काल (22 सप्टेंबर) संध्याकाळी 7 वाजेपासून पुढील 72 तास लोकशाही चॅनल बंद करण्याचे आदेश प्रसार मंत्रालयाने दिले आहेत. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या सरकारकडून सूडबुद्धीने माध्यमांचा गळा घोटला जातोय, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

We will continue to raise our voices together against this dictatorship – Amol Kolhe

ट्विट करत अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “ही कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या सरकारकडून सूडबुद्धीने माध्यमांचा गळा घोटला जातोय, या हीन वृत्तीचा जाहीर धिक्कार.

लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारितेची ज्याप्रकारे सत्ताधारी पक्षाकडून मुस्कटदाबी सुरू आहे, त्याचा समाजाच्या सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्हायलाच हवा!

सत्य हे पचायला कठीण जरी असलं तरी जनतेसमोर सत्य आणण हे माध्यमांचं कर्तव्य आहे. पण इथं चुकीचं वागणारा बाहेर फिरतो व खरं वागणाऱ्याला शासन होते.

अजब सरकारचा हा गजब कारभार पाहून हे सरकार लोकशाही विरोधी आहे, हे सिद्ध होतंय! कमलेशजी या लढ्यात आम्ही आपल्यासोबत खंबीरपणे उभे आहोत! आपण एकजुटीने या हुकूमशाही विरोधात आवाज बुलंद करत राहू!”

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ वाहिनीवर प्रसारित केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार (Kamlesh Sutar) यांनी ट्विट करत माहिती दिली.

ट्विट करत कमलेश सुतार म्हणाले, “किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही