Share

Chitra Wagh | “वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत…”; मणिपूर प्रकरणावर चित्र वाघांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जातीय दंगली घडताना दिसत आहे. या ठिकाणची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Two women were stripped by a mob in Manipur मणिपूरमध्ये जमावाने … Read more

Published On: 

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जातीय दंगली घडताना दिसत आहे. या ठिकाणची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Two women were stripped by a mob in Manipur

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढण्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर त्यांनी या महिलांवर सामूहिक बलात्कार केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.

ही घटना केवळ मणिपूर नाही तर 140 कोटी देशवासीयांना प्रचंड वेदना देणारी आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कालच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आणि 4 आरोपींना अटक सुद्धा झाली.”

“महिला सुरक्षा हा विषय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अधिक गांभीर्याने घेतला आणि सर्वच राज्यांना महिला सुरक्षेचे कायदे अधिक कठोर करण्यास सांगितले.

वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत राहणे, हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही, तर वेदनेवर उपचार अधिक महत्वाचा असतो.

मा. नरेंद्र मोदीजी यांची हीच कार्यशैली नेहमी राहिली आहे, आम्हाला खात्री आहे,मणिपूरच्या दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही”, असही त्यांनी या (Chitra Wagh) ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही