Share

Bharat Gogawale | महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक आहे की नाही; भरत गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य

Bharat Gogawale | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार गट सरकारमध्ये सामील होताच त्यातील नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक आहे की नाही असं वादग्रस्त वक्तव्य भरत गोगावले … Read more

Published On: 

Bharat Gogawale | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवार गट सरकारमध्ये सामील होताच त्यातील नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक आहे की नाही असं वादग्रस्त वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे.

I have 15 years of MLA experience – Bharat Gogawale

भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, “अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी चांगलं काम केलं असलं तरी आम्ही काय वाईट काम करू. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरुष यांच्यामध्ये फरक आहे की नाही. मला आमदारकीचा पंधरा वर्षे अनुभव आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा अनुभव माझ्याकडे आहे.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, “संजय राऊत यांच्या घरामध्ये निघालेल्या साप त्यांच्या तोंडाला चावायला हवा होता. कारण संजय राऊत खूप जास्त बोलतात. अति तिथे माती हे ठरलेलं असतं.”

“संजय राऊत चुकीचं बोलू नका, असं सांगण्यासाठी तो साप निघाला असेल. त्याचबरोबर त्या सापांनं त्यांना कमी बोलण्याचा इशाराही दिला असेल. माणसानं किती बोलावं यासाठी प्रत्येकाला लिमिट हवं”, असही ते (Bharat Gogawale) यावेळी म्हणाले.

भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये केलेल्या फरकाच्या वक्तव्यावर राज्याच्या राजकीय वर्तुळत नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही