Share

Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांना ‘कलंक’ हा शब्द एवढा का लागला? – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “त्यांना कलंक … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “त्यांना कलंक शब्द खूप लागला आहे. मात्र, कलंक या शब्दांमध्ये एवढं लागण्यासारखं काय आहे? ज्यांना माझा हा शब्द लागला असेल त्यांना मला विचारायचं आहे की, तुम्ही लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात. तुम्ही लोकांवर भ्रष्टाचाराचा कलंक लावतात. आमच्यावर आरोप करणारे आता स्वतःच त्यांच्या (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) मांडीला मांडी लावून बसले आहे. तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट तुम्ही म्हणाल तो देव? हे कुठलं हिंदुत्व आहे?”

The ruler is abusing the power – Uddhav Thackeray

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “माझा कलंकित शब्द एवढा परिणामकारक असेल, असं मला वाटलं नव्हतं. दुसऱ्यांवर आरोप करताना जनाची नाही तरी मनाची तरी ठेवा. आपण जाहीरपणाने लोकांच्या समोर जाऊन जनतेला निर्णय घ्यायला लावू. मात्र, सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत आहे, लोकांना उध्वस्त करत आहेत.”

“राज्यामध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जनतेच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देताना दिसत नाही. सरकार फक्त दारोदारी जात आहे. मात्र, सरकार घरात न जाता फक्त दारातून परत येत आहे. सरकार फक्त कार्यक्रमासाठी लोकांच्या दारी जात आहे”, असही ते यावेळी (Uddhav Thackeray) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही