Nilesh Rane | जास्त हसून बोलणारी लोकं नेहमी खोटारडी असतात; निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी फुटल्यानंतर काल पहिल्यांदा शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट आमने-सामने आले होते. काल मुंबईमध्ये दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी मिश्किल पद्धतीनं अजित पवार गटावर टीका … Read more

Published On: 

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी फुटल्यानंतर काल पहिल्यांदा शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट आमने-सामने आले होते. काल मुंबईमध्ये दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळेंनी मिश्किल पद्धतीनं अजित पवार गटावर टीका केली. यावरून निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना धारेवर धरलं आहे.

People who smile and talk a lot are always liars – Nilesh Rane

कालच्या भाषणामध्ये सुप्रिया सुळे यांनी हसत अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं. त्यावरून निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं आहे. हसून बोलणारी लोक नेहमी खोटारडी असतात, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही. जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे.”

दरम्यान, काल झालेल्या बैठकांमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार आमने-सामने आले होते. अजित पवार यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं. आमच्यावर किती पण टीका करा, पण बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही