Supriya Sule | भाऊ-बहिण आमने-सामने! अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

Supriya Sule | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने आले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गटाच्या आज मुंबईत बैठका झाल्या आहेत. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “मी … Read more

Published On: 

Supriya Sule | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने आले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गटाच्या आज मुंबईत बैठका झाल्या आहेत. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

“मी शरद पवार यांच्या छत्रछायेखाली घडलो आहे. मी कुठे चुकलो तर त्यांनी मला हक्काने सांगावं. मी ती चूक दुरुस्त करून पुढे जाईल. तुमचं (शरद पवार) वय आता 83 झालं आहे. तुम्हाला थांबायचं आहे की नाही? आम्हाला आशीर्वाद का दिला जात नाही? आमच्यात सरकार चालवायची धमक नाही का?”, अस अजित पवार म्हणाले.

Age does not prove one’s worth – Supriya Sule

अजित पवार यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वय हा एक फक्त आकडा आहे. वयावरून कुणाचं कर्तुत्व सिद्ध होत नाही. 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अनेक लोकांनी देश पुढे नेला आहे. यामध्ये रतन टाटा, अमिताभ बच्चन, सायरस पूनावाला इत्यादी लोकांचा समावेश आहे. आमच्यावर किती पण टीका करा, पण बापाचा नाद करायचा नाही.”

“जे मुलं आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद द्यायला सांगतात त्या मुलांपेक्षा मुली परवडल्या. घरावर संकट आले, अडचणी आल्या की मुलीच धावून येतात. त्याप्रमाणे आम्ही देखील कायम पवार साहेबांसोबत आहोत. जे गेले त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहे. जे गेले ते 2019 चा इतिहास विसरले असतील. मात्र, आम्ही ते विसरलेलो नाही. भर पावसात शरद पवारांनी सभा गाजवून सर्व बाजी पलटली होती. जे सोडून गेले ते गेले. आम्ही पुन्हा आमचा पक्ष उभा करू”, असही त्या (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही