🕒 1 min read
Chitra Wagh | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर टीका केली होती. भाजप राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड दिलं आहे.
NCP leaders stopped throwing pieces in front of Sanjay Raut – Chitra Wagh
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता ठाकरे गटाच्या सर्वज्ञानी संजय राऊतांसमोर तुकडे टाकायचे बंद केल्यामुळे त्यांची चांगलीच उपासमार होतेय.”
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता ठाकरे गटाच्या सर्वज्ञानी @rautsanjay61 समोर तुकडे टाकायचे बंद केल्यामुळे त्यांची चांगलीच उपासमार होतेय.
अडीच वर्षं ज्या मालकांनी बिस्कीट खाऊ घातलं, ज्यांच्या इशाऱ्यावर राऊत शेपूट हलवत होते, त्यांनीच यांच्या गळ्यातली साखळी सोडलीय. म्हणून त्यांची… pic.twitter.com/ALFHnStC8f
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 4, 2023
“अडीच वर्षं ज्या मालकांनी बिस्कीट खाऊ घातलं, ज्यांच्या इशाऱ्यावर राऊत शेपूट हलवत होते, त्यांनीच यांच्या गळ्यातली साखळी सोडलीय. म्हणून त्यांची अवस्था पिसाळल्यासारखी झालीय. सकाळी सकाळी भुंकणा-यांनी उच्छाद मांडला आहे…माझी बीएमसी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, यांना जाळीच्या गाडीत टाकून त्वरीत बंदोबस्त करावा”, असही त्या (Chitra Wagh) या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप सरकारवर (Chitra Wagh) टीकास्त्र चालवलं. ते म्हणाले, “भाजपनं शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांना पकडून पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर भाजपनं दावा करायला लावला आहे. एखाद्या पक्षाला विशिष्ट आकड्यात फोडायचं आणि त्यांना दावा करायला लावायचं काम भाजप करत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गट अस्वस्थ – जयंत पाटील
- Sudhir Mungantiwar | राष्ट्रवादीची अवस्था ‘शोले’सारखी झाली आहे, आधे इधर आधे उधर – सुधीर मुनगंटीवार
- Ajit Pawar | शिंदे गटाला मोठा दणका! अजित पवार गटाला मिळणार ‘हे’ महत्त्वाचे खाते
- Vijay Wadettiwar | भाजपचा DNA हा ओबीसी विरोधी – विजय वडेट्टीवार
- Praful Patel | “तेव्हा 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली पण शरद पवारांनी…”; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











