Share

Sunil Raut | ती एक कीड होती, जी निघून गेली; सुवर्णा कारंजे यांच्या पक्षांतरावर सुनील राऊतांची प्रतिक्रिया

Sunil Raut | मुंबई: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी सुरू असतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या माजी नगरसेवका सुवर्णा कारंजे (Suvarna Karanje) यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षांतर करत असताना सुवर्णा कारंजे यांनी सुनील राऊत यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांना सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर … Read more

Published On: 

Sunil Raut | मुंबई: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी सुरू असतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या माजी नगरसेवका सुवर्णा कारंजे (Suvarna Karanje) यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षांतर करत असताना सुवर्णा कारंजे यांनी सुनील राऊत यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांना सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Defections were a pest to the party – Sunil Raut

सुवर्णा कारंजे यांनी केलेल्या आरोपावर सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुनील राऊत म्हणाले, “जो चांगलं काम करतो, त्याच्यावरच नेहमी आरोप केले जातात. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाची मला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. काल कांजुरच्या शाखेत फटाकेबाजी सुरू होती.”

पुढे बोलताना ते (Sunil Raut)  म्हणाले, “कांजुरमध्ये आनंदोउत्सव साजरा केला जात होता. आनंद साजरा करणारी ही लोक पक्षाला लागलेली कीड होती. ही कीड काल पक्षातून निघून गेली आहे. आर्थिक व्यवहारामुळे सुवर्णा कारंजे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. निष्ठा वगैरे ही सगळी खोटी कारणं आहे. जिथे आर्थिक गोष्टी असतात तिकडे त्या जातात.”

दरम्यान, सुवर्णा कारंजे यांनी पक्ष सोडताना सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यावर आरोप केला होता. सुवर्णा कारंजे म्हणाल्या, “सुनील राऊत यांनी मला मानसिक त्रास दिला आहे. त्याचबरोबर ते अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात. मला तिकीट मिळू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या सर्व बाबींची मी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे अनेकदा तक्रार केली होती. त्यांनाही माहित होतं की त्यांचा भाऊ मला त्रास देत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install