Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar Vs Sanjay Raut | नागपूर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र चालवलं होतं. धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. There is unity among the senior leaders of Mahavikas … Read more

Published On: 

Ajit Pawar Vs Sanjay Raut | नागपूर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र चालवलं होतं. धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There is unity among the senior leaders of Mahavikas Aghadi

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे महाविकास आघाडी तुटणार का? असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार म्हणाले, “जोपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा एकोपा आहे, तोपर्यंत मविआला काहीही होणार नाही. कुणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी कुणाला काही सांगत नाही. परत आम्ही काही बोललो तर लोकांना त्याचं वाईट वाटतं.”

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृत्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांनी बोलताना संयम राखला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार (Ajit Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये सुरू असलेल्या वाद वाढत चालला आहे. त्यांच्या या वादाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही