Share

Anil Mahajan | महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी अनिल महाजन रुजू

Anil Mahajan | जळगाव : महावितरणच्या जळगाव मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी श्री.अनिल महाजन नुकतेच रुजू झाले आहेत. श्री.महाजन यापूर्वी कल्याण परिमंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती झाली आहे. श्री.महाजन यांनी आपल्या कारकिर्दीत अति उच्च दाब उपकेंद्रासह पारेषण वाहिनी उभारणीत मोलाचा वाटा उचललेला आहे. तसेच त्यांनी अलिबाग (जि.रायगड), बदलापूर … Read more

Published On: 

Anil Mahajan | जळगाव : महावितरणच्या जळगाव मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी श्री.अनिल महाजन नुकतेच रुजू झाले आहेत. श्री.महाजन यापूर्वी कल्याण परिमंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती झाली आहे. श्री.महाजन यांनी आपल्या कारकिर्दीत अति उच्च दाब उपकेंद्रासह पारेषण वाहिनी उभारणीत मोलाचा वाटा उचललेला आहे. तसेच त्यांनी अलिबाग (जि.रायगड), बदलापूर (जि.ठाणे ) उपविभाग, पनवेल ग्रामीण विभाग कार्यालय, रत्नागिरी विभाग, मुख्य कार्यालय मुंबई येथे वाणिज्य विभाग ( ओपन अॅक्सेस, सोलर रूफ टाॅप), परिमंडळ कार्यालय कल्याण येथे विविध पदांवर उल्लेखनीय काम केलेले आहे.

जळगाव मंडलात वीजग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. मंडलातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ग्राहकसेवा उंचावण्यावर भर देणार आहे, असे अधीक्षक अभियंता श्री.अनिल महाजन यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही