Maharashtra Political Crisis | …म्हणून उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेबद्दल बोलू नये; माधव भंडारींची ठाकरेंवर टीका

Madhav Bhandari |अहमदनगर : काल (11मे ) महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने वाचून दाखवला आहे. यामध्ये कोर्टाकडून अनेक मुद्धे मांडले असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. लवकरात- लवकर अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. निकालानंतर सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर … Read more

Published On: 

Madhav Bhandari |अहमदनगर : काल (11मे ) महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने वाचून दाखवला आहे. यामध्ये कोर्टाकडून अनेक मुद्धे मांडले असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. लवकरात- लवकर अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. निकालानंतर सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निकालाबाबत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असल्याचं म्हटलं. त्यावर आता भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी ( Madhav Bhandari) यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले माधव भंडारी (What did Madhav Bhandari say)

माध्यमांशी संवाद साधताना माधव भंडारी म्हणाले की, उद्धव ठाकरेंना 2019 मध्ये सरकार स्थापन करताना नैतिकता हा शब्द देखील आठवला नाही त्यांनी आता नैतिकतेबद्दल बोलू नये. ज्यांनी नैतिकता पाळलेली असते त्यांनीच नैतिकतेबद्दल भाष्य करावं. अशी टीका माधव भंडारी यांनी उद्धव ठाकरेंनवर केली आहे. तसचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निकालानंतर ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं की, जेव्हा ठाकरे भाजपसोबत निवडून आले आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती. तुम्हाला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. असा निशाणा फडणवीस यांनी ठाकरेंवर साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होत की, “अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपवला असला तरी पक्षादेश आमचाच राहील. त्याचबरोबर अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मी करणार आहे. कारण माझी लढाई सत्तेसाठी नाही तर माझी लढाई जनतेसाठी आणि देशासाठी आहे. मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असल्याचं देखी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. याचप्रमाणे जसा मी राजीनामा दिला होता तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही द्यावा आणि निवडणूक लढवण्यासाठी मैदानात यावं, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही