Share

Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Bank of Baroda | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी (Bank Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक … Read more

Published On: 

Bank of Baroda | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी (Bank Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 184 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन/ गार्डनर पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Bank of Baroda)शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Bank of Baroda) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities

जाहिरात पाहा (View ad)

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.bankofbaroda.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install