Share

MAHA Security | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

MAHA Security | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (Maharashtra State Security Corporation) विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. महाराष्ट्र … Read more

Published On: 

MAHA Security | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (Maharashtra State Security Corporation) विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MAHA Security) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संचालक – प्रतिष्ठापना- 01 जागा, सह संचालक – 02 जागा, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी- 05 जागा, सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (MAHA Security) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (MAHA Security) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.mahasecurity.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://bit.ly/418ZYt3

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही