Share

Anna Hazare | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मारण्याची धमकी!

🕒 1 min read Anna Hazare | अहमदनगर : राज्यात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यवरून वाद पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांची नासाडी केलेली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शेतीच्या वादातून ही धमकी देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Anna Hazare | अहमदनगर : राज्यात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यवरून वाद पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांची नासाडी केलेली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शेतीच्या वादातून ही धमकी देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोणी दिली जीवे मारण्याची धमकी -(Who threatened to kill)

तर शेतीच्या वादातून श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने यांनी १ मे रोजी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं म्हटलं आहे. कारण शेतीच्या वादात न्याय मिळावा यासाठी संतोष गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिलं होतं त्यामध्ये त्यांनी मदतीची मागणी केली होती. मात्र अण्णा हजारे यांनी निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप गायधने यांनी केला आहे. तसंच राळेगण सिद्धीत जाऊन अण्णांची हत्या करणार असल्याचा इशारा गायधने यांनी दिला आहे.

दरम्यान, गायधने यांनी सांगितलं की, मी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. मात्र मी कायर नाही अण्णा हजारेंची हत्या करणार हे जाहीरपणे सांगू शकतो. असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही