Share

Sandalwood Powder | उन्हाळ्यामध्ये चेहरा थंड ठेवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर

🕒 1 min readSandalwood Powder | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी (Face Care) अधिक घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये त्वचेला थंडावा (Cooling effect) प्रदान करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडर एक सर्वोत्तम उपाय ठरू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर याच्या मदतीने चेहऱ्यावरील … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sandalwood Powder | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी (Face Care) अधिक घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये त्वचेला थंडावा (Cooling effect) प्रदान करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडर एक सर्वोत्तम उपाय ठरू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर याच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फ्रिंकल्स इत्यादी समस्या सहज दूर होतात. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने चंदन पावडरचा वापर करू शकतात.

दही आणि चंदन पावडर (Curd & Sandalwood Powder For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही चंदन पावडरसोबत दह्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये एक चमचा दही मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तेलकट त्वचेची समस्या दूर होऊ शकते.

मुलतानी माती आणि चंदन पावडर (Multani Mati & Sandalwood Powder For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडर आणि मुलतानी माती उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये एक चमचा मुलतानी माती आणि तीन चमचे गुलाब जल मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने सनबर्नची समस्या सहज दूर होऊ शकते.

गुलाब जल आणि चंदन पावडर (Rose Water & Sandalwood Powder For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये चंदन पावडर आणि गुलाब जलचा वापर केल्याने चेहऱ्याला थंडावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये तीन चमचे गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये चेहरा थंड ठेवण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने चंदनाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने आवळ्याचा वापर करू शकतात.

गुलाब जल आणि आवळा (Rose water & Amla For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी गुलाब जल आणि आवळा पावडर उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळा पावडरमध्ये चार ते पाच थेंब गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावी लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

आवळा पेस्ट (Amla paste For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याची पेस्ट वापरू शकतात. यासाठी तुम्हाला एक ते दोन आवळे घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटे केसांना लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एक वेळा या पेस्टचा वापर केल्याने तुमचे केस निरोगी राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!