Share

Green Tea | नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ फायदे

🕒 1 min read Green Tea | टीम महाराष्ट्र देशा: ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीचे सेवन करून करतात. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर ग्रीन टी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart health) देखील फायदेशीर ठरू शकते. दररोज ग्रीन टीचे सेवन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Green Tea | टीम महाराष्ट्र देशा: ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीचे सेवन करून करतात. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर ग्रीन टी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart health) देखील फायदेशीर ठरू शकते. दररोज ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर नियमित ग्रीन टी प्यायल्याने हृदयाच्या आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते (Cholesterol remains under control-Green Tea For Heart)

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त राहिल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही नियमित ग्रीन टीचे सेवन करू शकतात. ग्रीन टीचे सेवन केल्याने रक्तातील एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Green Tea For Heart)

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी वजन नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने मेटाबोलिझम वाढते आणि पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ग्रीन टीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood pressure remains under control-Green Tea For Heart)

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. परिणामी हृदयविकाराचा झटका आणि हृदयाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने हृदयाच्या वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानाचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

कडुलिंबाची पाने (Neem leaf-For Diabetes)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फक्त कडुलिंबाच्या पानांचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा कडुलिंबाची पाने धुवून त्याचे सेवन करावे लागेल. नियमित असे केल्याने रक्तातील सारखेची पातळी कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.

कडुलिंब पानांचे पाणी (Neem leaf water-For Diabetes)

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंब पानांच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला पाच ते सहा कडुलिंबाची पाने एक ग्लास पाण्यामध्ये पाच मिनिटे उकळून घ्यावे लागेल. हे पाणी अर्धे झाल्यावर तुम्हाला गाळून त्याचे सेवन करावे लागेल. नियमित या पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीर निरोगी राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही