Share

Job Opportunity | जॉब अलर्ट! नागपूरमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेत मुलाखती देखील आयोजित करण्यात … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेत मुलाखती देखील आयोजित करण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या 7 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना 9 मार्च 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहणे अनिवार्य आहे. मुलाखत आणि अर्ज उमेदवारांना पुढील पत्त्यावर सादर करावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

अधिकृत वेबसाईट

http://www.gmcnagpur.org/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1XhUvM2sKSobUj79QLXYkjNbpGqZ0qF48/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install