Share

Job Opportunity | नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. अशात अनेक संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College), नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. अशात अनेक संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College), नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 109 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशिलांबाबत अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार

अधिकृत वेबसाईट

https://gmcnandurbar.com/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1SJZtAtJfuXqfyiiDHEG4SQpuDTN9oUdk/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही