Job Opportunity | ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी संस्थेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. ठाणे … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी संस्थेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 5 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://thanecity.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प), पिनकोड- ४००६०२

अधिकृत वेबसाईट

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1jWSRIqN4I62VeJ64sMjumKmr7l4am8Wv/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही