Share

Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

🕒 1 min read Jayant Patil | पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकारणात सध्या तुफान चर्चा सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकारणात सध्या तुफान चर्चा सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत नाना काटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

जयंत पाटलांचे ट्वीट (Jayant Patil’s Twit)

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.  महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1622810208505593856?s=20&t=YTN45pCHZxuJT7QQv6UF4w

दरम्यान, महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार देऊनही शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत या मुद्द्यावरुन बिघाडी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही