Share

Job Opportunity | बँकेत नोकरीची संधी! ‘या’ बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक centralbankofindia.co.in या अधिकृत … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 250 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना फी भरावी लागणार आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागणार आहे. तर महिला/SC/ST/PWD/ उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही