Satyajeet Tambe Suspended | मोठी बातमी! सत्यजित तांबे निलंबित; कोण असणार आघाडीचे उमेदवार?

Satyajeet Tambe Suspended | मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यावरून काही मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शुंभागी पाटील (Shubhangi Patil) यांनी काही … Read more

Published On: 

Satyajeet Tambe Suspended | मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यावरून काही मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.

दरम्यान, नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शुंभागी पाटील (Shubhangi Patil) यांनी काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झाले असताना निर्णय न झाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

नाशिकमधील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. या सर्व चर्चेचा खुलासा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतिने बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करण्यात आले.

यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.

शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार असून ते रुग्णालयात आहे लवकरच ते बाहेर येतील असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, काँग्रेसने यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही