Sharad Pawar | “शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही, धमकीमुळे विरोधी पक्षनेतेपद मिळालं”

Sharad Pawar | सातारा : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलेलं आहे. एकीकडे शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (union minister of state for home ajay kumar mishra) यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) … Read more

Published On: 

Sharad Pawar | सातारा : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलेलं आहे. एकीकडे शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (union minister of state for home ajay kumar mishra) यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांचा अजित पवारांवर (Ajit Pawar) विश्वास नसल्याचं अजयकुमार मिश्रा यांनी म्हंटल आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात ते बैठका घेत आहेत. साताऱ्यातील कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यांच्या या आरोपावार पलटवार करताना अजयकुमार मिश्रा म्हणाले, “शरद पवार (Sharad Pawar) यांचा अजित पवारांवर (Ajit Pawar) विश्वास नाही. धमकीमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दुसऱ्याला देणार होते.” दरम्यान, अजयकुमार मिश्रा यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार काय उत्तर देतात का?, हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही