🕒 1 min read
एका ‘क्लिक’वर नाती जोडली जातात आणि एका ‘क्लिक’वर तुटतात सुद्धा, सोशल मीडियाच्या जगात हे नवीन नाही. पण जेव्हा विषय टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलचा असतो, तेव्हा चर्चा तर होणारच! सध्या क्रिकेटच्या मैदानापेक्षा चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. चहल आणि त्याची कथित मैत्रीण आरजे महवश (RJ Mahvash) यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. “यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसलंय,” असा अंदाज आता चाहते लावत आहेत.
Yuzvendra Chahal-RJ Mahvash Unfollow Row
2025 मध्ये धनश्री वर्माशी घटस्फोट झाल्यानंतर चहलचं नाव आरजे महवशशी जोडलं गेलं होतं. लंडन ट्रिपचे फोटो असो किंवा आयपीएलच्या मॅचेस, हे दोघे अनेकदा स्पॉट झाले होते. पण आता चित्र बदललंय. एकेकाळी एकमेकांच्या पोस्ट लाईक करणारे हे दोघे आता एकमेकांच्या फॉलोअर्स लिस्टमधून गायब झाले आहेत. महवशने तर एक व्हिडिओ शेअर करत थेट बॉम्बच टाकला. ती म्हणाली, “2026 मध्ये माझं ‘फिक्स इट’ बिहेवियर संपलंय. कुणी घाणेरडी हरकत केली तर तो बाहेर… कारण चुकून काहीच होत नाही, सगळं ठरवून केलं जातं.” तिचं हे विधान थेट चहलसाठी होतं का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
युजवेंद्र चहल आणि आरजे महवश वादात चहलने थेट काहीही बोलणं टाळलं असलं तरी, त्याची इन्स्टा स्टोरी खूप काही सांगून जाते. त्याने भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा एक संदर्भ देत लिहिलंय, “जगात प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. काहीवेळा शांत राहणेच योग्य असते, मग भलेही इतरांना तुम्ही चुकीचे वाटत असाल.”
काही दिवसांपूर्वीच चहलने “मी सिंगल आहे आणि खुश आहे,” असं सांगत महवशसोबतच्या नात्याचा इन्कार केला होता. “असं असलं तरी”, आता या अनफॉलो प्रकरणामुळे आणि सूचक पोस्ट्समुळे डाळ नक्कीच शिजत होती आणि आता ती करपली आहे, असं म्हणायला वाव आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सागर भाऊ, मळ तू डबल..’, डीपी दादाने शेअर केला बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ, म्हणाला…..
- 32 चेंडूत 76 धावा चोपल्या, तरीही सूर्या ईशानवर भडकला! मॅच संपल्यावर कारण सांगितलं
- Ladki Bahin Yojana: पैसे अडकले? टेन्शन घेऊ नका; आदिती तटकरेंनी दिला ‘हा’ नंबर, एका कॉलवर काम होणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











