Share

Ladki Bahin Yojana: पैसे अडकले? टेन्शन घेऊ नका; आदिती तटकरेंनी दिला ‘हा’ नंबर, एका कॉलवर काम होणार!

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी. e-KYC च्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी 181 हेल्पलाइन सुरू. आता घरबसल्या समस्या सुटणार.

Published On: 

Ladki Bahin Yojana Helpline : पैसे आले नाहीत? 181 वर कॉल करा, आदिती तटकरेंची मोठी माहिती

मुंबई : खात्यात पैसे आले नाहीत? e-KYC चुकलंय की अजून काही गडबड झालीय? सध्या अनेक महिलांच्या मनात हेच प्रश्न घर करून आहेत. बँकेत हेलपाटे मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसेल, तर आता काळजीचं कारण नाही. राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. Ladki Bahin Yojana संदर्भात तुमच्या कोणत्याही तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 181 हा खास हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

Ladki Bahin Yojana Helpline

अनेकदा फॉर्म भरताना किंवा ई-केवायसी (e-KYC) करताना महिलांकडून नकळत चुकीचा पर्याय निवडला जातो. “त्यामुळेच” काहींचे हप्ते थांबले आहेत तर काहींचा लाभ तात्पुरता स्थगित झाला आहे. या तांत्रिक अडचणींमुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण आता हा गोंधळ दूर होणार आहे. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की, 181 या क्रमांकावर कॉल केल्यास ऑपरेटर तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतील. यासाठी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.

ज्या महिलांची ई-केवायसी करताना चूक झाली आहे, त्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत ‘फिल्ड लेव्हल’वर पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच, आता तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही, अंगणवाडी ताई स्वतः पडताळणी करतील आणि तुमचं अडकलेलं काम मार्गी लावतील.

काही दिवसांपूर्वीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते न मिळाल्याने विदर्भातील भंडारा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये महिलांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला होता. नोव्हेंबरचे पैसे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि डिसेंबरचा हप्ता 14 जानेवारीच्या आसपास जमा करण्यात आला आहे. “असं असलं तरी”, ज्यांच्या खात्यात अजूनही 1500 रुपये आले नाहीत, त्यांनी तात्काळ 181 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मंत्र्यांनी केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही