32 चेंडूत 76 धावा चोपल्या, तरीही सूर्या ईशानवर भडकला! मॅच संपल्यावर कारण सांगितलं

ईशान किशनने न्यूझीलंडविरुद्ध 76 धावांची खेळी केली, पण स्ट्राईक न मिळाल्याने कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्यावर नाराज झाला होता. सामना संपल्यावर सूर्यानेच सांगितला हा किस्सा.

Published On: 

Ind Vs Nz 2nd T20 : ईशानने 76 धावा केल्या पण सूर्या का चिडला? कारण वाचून हसाल!

क्रिकेटमध्ये असं कधी घडतं का की, समोरचा फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडतोय आणि नॉन-स्ट्राइकर एंडला उभा असलेला कर्णधार मात्र त्याच्यावर चिडलाय? ऐकायला विचित्र वाटेल, पण रायपूरच्या मैदानात नेमकं हेच घडलं. भारताने न्यूझीलंडला धूळ चारत मालिका खिशात घातली खरी, पण या सामन्यात एक भन्नाट किस्सा घडला. Ind Vs Nz 2nd T20 सामन्यात ईशान किशनने 76 धावांची तुफानी खेळी केली, पण याच खेळीदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्यावर चांगलाच वैतागला होता. सामना संपल्यानंतर खुद्द सूर्यानेच यामागचं गंमतीशीर कारण सांगितलं.

Ind Vs Nz 2nd T20

भारतासमोर 209 धावांचं मोठं आव्हान होतं आणि अवघ्या 6 धावांवर दोन विकेट्स पडल्या होत्या. चाहते टेन्शनमध्ये असताना ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. ईशानने अवघ्या 32 चेंडूत 76 धावा कुटल्या. पण या पार्टनरशिपमध्ये एक अशी वेळ आली जेव्हा सूर्याला राग अनावर झाला.

सामना जिंकल्यानंतर सूर्याने मनातील गोष्ट बोलून दाखवली. तो हसत म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये त्याने (ईशानने) मला स्ट्राइकच दिली नाही, त्यामुळे मला थोडा राग आला होता.” ईशानने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये इतकी आक्रमक बॅटिंग केली की सूर्याला बॅटिंगची संधीच मिळत नव्हती. पण पुढे सूर्यानेही तोल सावरला. तो म्हणाला, “काही हरकत नाही, मला नंतर खेळायला वेळ मिळाला आणि मला माहीत होतं की संधी मिळताच मी त्याची भरपाई करेन.” सूर्यानेही 37 चेंडूत 82 धावांची ‘कॅप्टन इनिंग’ खेळली.

ईशानच्या बॅटिंगचं कौतुक करताना सूर्याला शब्दही सुचत नव्हते. “मला माहिती नाही ईशानने दुपारी जेवणात काय खाल्लं होतं किंवा काय तयारी केली होती. पण 6 धावांवर दोन विकेट पडल्यावर अशी फटकेबाजी मी कधीच पाहिली नाही. पॉवरप्ले संपेपर्यंत 70 धावा करणं हे अविश्वसनीय होतं,” असं म्हणत सूर्याने ईशानच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

सध्या मी माझ्या आयुष्यातील आणि खेळातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे, असंही सूर्याने स्पष्ट केलं. नेट्समधील सराव आणि घरच्यांसोबत घालवलेला वेळ यामुळे हा फॉर्म कायम असल्याचं त्याने सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही