प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: अनेकदा आपण पाहतो की, मद्यपान करताना काही जणांना एकाच पेगमध्ये नशा चढते, तर काही जणांवर दारूचा परिणाम खूप उशिरा होतो. हे केवळ योगायोग नसून, यामागे विशिष्ट वैज्ञानिक आणि शारीरिक कारणे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
व्यक्तीचे वय, शरीराचे वजन, लिंग, मद्यपानाचा वेग आणि शरीराची दारू पचवण्याची क्षमता (अल्कोहोल मेटाबॉलिझम) या प्रमुख घटकांवर नशेची पातळी अवलंबून असते. शरीरात दारू गेल्यानंतर ती रक्ताद्वारे विविध अवयवांपर्यंत पोहोचते. ज्या व्यक्तींच्या शरीरात पाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते, त्यांच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण (कॉन्सन्ट्रेशन) वेगाने वाढते. त्यामुळे समान प्रमाणात दारू पिऊनही अशा व्यक्तींना नशा लवकर चढते. याशिवाय, सामान्यतः कमी वजन असलेल्या व्यक्तींवरही दारूचा प्रभाव जलद गतीने होत असल्याचे दिसून येते.
रिकाम्या पोटी मद्यपान करणे हे नशा त्वरित चढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. रिकाम्या पोटी दारू प्यायल्यास ती शरीरात अतिशय वेगाने शोषली जाते आणि ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन त्वरित वाढते. याउलट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त जेवण केलेले असल्यास, पोटातील छोट्या आतड्यांमध्ये दारू पोहोचण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे रिकाम्या पोटी मद्यपान करणाऱ्यांना खूप कमी वेळात नशा जाणवू लागते.
काही व्यक्तींना दारू सहन करण्याची क्षमता (टॉलरन्स) वाढलेली असल्यामुळे नशा कमी चढल्याचे वरवर दिसू शकते. मात्र, दारू पचवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे शरीर सुरक्षित राहते, हा निव्वळ गैरसमज आहे. नशा कमी जाणवली तरीही दारूचे शरीरावरील दुष्परिणाम होतच असतात. (वैधानिक इशारा : मद्यपान आरोग्यास हानिकारक असून त्याचे सेवन शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. आरोग्यविषयक समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
📌 महत्वाच्या बातम्या
- इलेक्ट्रीक किटलीमधील चहा-कॉफीचे डाग ५ मिनिटांत काढा, भांडे होईल लख्ख
- पैशांच्या वादातून मित्रांनीच केली २१ वर्षीय तरुणाची हत्या; भुसावळमधील खळबळजनक घटना
- मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याला लग्नाची इच्छा भोवली; परदेशी नवरदेवाच्या आमिषाने गमावले १७ लाख रुपये
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








