Share

तुळजापुरात भवानी ज्योत नेणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून मारहाण? शटर बंद करून बदडल्याचा आरोप

तुळजाभवानीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या अहिल्यानगरच्या तरुणांना पोलिसांकडून शटर बंद करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Published On: 

Tuljapur temple police altercation youth beaten over bhavani jyot

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: नवरात्रोत्सवानिमित्त आई तुळजाभवानीची ‘भवानी ज्योत’ नेण्यासाठी आलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांना पोलिसांनी शटर बंद करून मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा आणि पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देवीच्या नवरात्र महोत्सवासाठी हे तरुण तुळजापूर (Tuljapur) येथील मंदिर परिसरात आले होते. तरुणांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्योत पेटवताना वापरले जाणारे तेल अंगावर पडल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच रागातून पोलिसांनी त्यांना भवानी ज्योत पेटवण्यास मज्जाव केला. त्यानंतर थेट शटर ओढून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप या तरुणांनी केला आहे.

या कथित मारहाणीनंतर संबंधित तरुण तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांची कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रार न घेतल्याने मंदिर परिसर आणि पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. भवानी ज्योत नेण्यासाठी आलेल्या भक्तांवरच असा प्रसंग ओढवल्याने नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही