वेळ आणि मेहनत वाचवणारे ५ भन्नाट ब्युटी हॅक्स; मेकअप रुटीन होईल अगदी सोपं!

महागड्या उत्पादनांशिवाय आणि कमी वेळेत सौंदर्य खुलवण्यासाठी रोजच्या वापरातील काही भन्नाट आणि सोपे ब्युटी हॅक्स नक्की जाणून घ्या.

Published On: 

Beauty Hacks simple makeup routine tips

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: दररोजच्या धावपळीत सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकदा महागड्या उत्पादनांची किंवा पार्लर ट्रीटमेंटची गरज भासतेच असे नाही. त्वचा आणि केसांची योग्य काळजी घेणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून, यासाठी रोजच्या सवयी महत्त्वपूर्ण ठरतात. घरच्या घरी काही साध्या आणि भन्नाट ब्युटी हॅक्सचा (Beauty Hacks) वापर करून तुम्ही तुमचे रुटीन सोपे करू शकता, ज्यामुळे तुमचा बहुमूल्य वेळ आणि मेहनत नक्कीच वाचेल.

चेहरा आणि हाता-पायांना सनस्क्रीन लावताना आपण ओठांकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने ओठ काळवंडण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून अर्धा चमचा अ‍ॅलोवेरा जेलमध्ये बारीक साखर मिसळून ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. ओठ जास्त घासू नयेत. १० ते १५ दिवस हा उपाय नियमित केल्यास ओठांमध्ये सकारात्मक फरक जाणवू शकतो. दुसरीकडे, फेस वाइप्सचे पाकीट उघडे राहिल्याने ते कोरडे झाल्यास फेकून देण्याची गरज नाही. त्यात थोडे पाणी टाकून ते पुन्हा ओलसर करता येतात. पण वाइप्सचा वास किंवा पोत बदलला असल्यास त्याचा वापर टाळणेच योग्य ठरेल.

नेलपॉलिश लावल्यानंतर ते सुकण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी एका भांड्यात बर्फाचे थंडगार पाणी घेऊन त्यात काही काळ बोटे बुडवून ठेवल्यास नेलपॉलिश लवकर सुकायला मदत होते. तसेच, सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली सूज आल्याचे जाणवत असल्यास, तिथे थंड केलेल्या ग्रीन टी बॅग्ज १० मिनिटांसाठी ठेवाव्यात. त्यानंतर चेहरा स्वच्छ करावा. मात्र, जळजळ किंवा त्रास वाटल्यास हा उपाय त्वरित थांबवावा.

स्लीक बन किंवा स्लीक हेअरस्टाइल करताना डोक्यावरील छोटे केस (बेबी हेअर) वारंवार बाहेर डोकावतात. हे केस नीट सेट करण्यासाठी एका स्वच्छ टूथब्रशवर थोडासा हेअर स्प्रे मारा आणि तो बेबी हेअरवर हलक्या हाताने फिरवा. या छोट्याशा ट्रिकमुळे छोटे केस जागेवर राहून तुम्हाला उत्तम स्लीक लूक मिळवण्यास मदत होऊ शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही