तनुश्री दत्ताचा धक्कादायक दावा: ‘नाना पाटेकर जिवंत आहेत, मृत्यूचं नाटक रचलं’; नेटकरी भडकले

नाना पाटेकर जिवंत असून त्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी मृत्यूचे नाटक रचल्याचा दावा तनुश्री दत्ताने केला आहे. या दाव्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल अभिनेत्री तनुश्री दत्ताने एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. 'नाना पाटेकर अद्याप जिवंत आहेत', असे विधान तिने केले असून, यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या ७५ व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त समोर आले होते. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात आली होती आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. मात्र, तनुश्री दत्ताने त्यांच्या मृत्यूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नाना पाटेकर यांनी स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचले आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्र मिळवले असावे, असा तिचा दावा आहे. तसेच, ते सध्या सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असू शकतात, असेही तिने म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या तिच्या या व्हिडीओ आणि कॅप्शननंतर युजर्सनी तिला चांगलेच सुनावले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'तिच्यात लाज नावाची गोष्टच उरली नाही', तर दुसऱ्याने 'जो व्यक्ती या जगातच नाही, त्याच्याबद्दल का बोलत आहेस?' असा सवाल केला आहे. काहींनी तिच्या मिस इंडिया असण्यावरही उपहासात्मक टीका केली असून, 'तिला आता वर्षभर ओढण्यासाठी नवीन विषय भेटलाय', अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

याव्यतिरिक्त, 'कॅप्शनवरून स्पष्ट होतेय की हिच्याकडे काहीच काम नाही' आणि 'आता कितीही नाटक केले तरी सिनेमात काम मिळणार नाही', अशा शब्दांत लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील हा वाद २०१८ मधील 'मीटू' मोहिमेपासूनचा आहे. २००८ साली आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन आणि लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तनुश्रीने केला होता. मात्र, नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

तनुश्री दत्ताच्या दाव्यानुसार नाना पाटेकर अद्याप जिवंत आहेत. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचले, बनावट मृत्यू प्रमाणपत्र मिळवले असावे आणि ते सध्या सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असू शकतात, असे तिने म्हटले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही