प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संथ षटक गती (Slow Over Rate) राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. या दंडात्मक कारवाईमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे.
संथ षटक गतीबद्दल आयसीसीने श्रीलंकेचे तब्बल १५ मौल्यवान गुण वजा केले आहेत. या मोठ्या कारवाईनंतर श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. तसेच, त्यांच्या गुणांची टक्केवारी ३३.३३ टक्क्यांवरून थेट १५.४७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
याच पहिल्या कसोटीत संथ षटक गती राखल्याने पाकिस्तान संघालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयसीसीने पाकिस्तानचे पाच गुण कमी केले असून, यामुळे त्यांचा संघ WTC गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर म्हणजेच सर्वात तळाला फेकला गेला आहे. या पाच गुणांच्या कपातीनंतर पाकिस्तानची गुण टक्केवारी आता केवळ ३.३३ टक्के इतकीच उरली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर ‘मफलरमॅन’ उल्लेख करत गंभीर आरोप, सत्यजीत तांबेंची पोस्टद्वारे एन्ट्री
- राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; आईच्या पुस्तक प्रकाशनात सांगितला केंब्रिजमधील किस्सा
- SRA आरोपांवरून प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांवर पलटवार; अपना घर घोटाळ्याप्रकरणी दिला कारवाईचा इशारा








