प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर दुःख व्यक्त केले जात आहे. मात्र, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या नकारात्मक वक्तव्यांनंतर आता अभिनेत्री संध्या मृदुल हिनेही त्यांच्यावर (Nana Patekar) अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे. तिने इन्स्टाग्रामवर थेट नाव न घेता केलेल्या पोस्ट या तनुश्री दत्ताला पाठिंबा देणाऱ्या आणि नानांच्या विरोधात असल्याच्या चर्चा आहेत.
संध्या मृदुलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. तिने म्हटले आहे, “एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अत्याचारी म्हटलं जात नाही का? त्याने दिलेल्या वेदना गायब होतात का? पण पीडितांसाठी असं घडत नाही.” तसेच, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने स्पष्ट केले की, “एक पीडित व्यक्ती जोपर्यंत जिवंत असते, तोपर्यंत त्या वेदनेसह जगते. मी नेहमीच पीडितेच्या पाठीशी उभी राहिन.” या वाक्याच्या शेवटी तिने #MeToo असा हॅशटॅगही वापरला आहे.
याशिवाय संध्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही काही पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिने थेट विचारले आहे की, “एखाद्या अत्याचाऱ्याच्या मृत्यूवर तुम्ही शोक कसा व्यक्त करू शकता?” दुसऱ्या एका सविस्तर पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “एखाद्या व्यक्तीच्या मरण्याने त्याने केलेलं नुकसान पुसलं जात नाही. छळ करणाऱ्याच्या मृत्यूमुळे छळाची गोष्ट खोटी ठरत नाही. जनतेच्या श्रद्धांजलीदरम्यान पीडितेसोबत घडलेली घटना कमी सत्य ठरत नाही. कोणाच्या तरी मृत्यूवर शोक व्यक्त करणं योग्य आहे, पण त्यांच्याशी जोडलेल्या वेदनांमुळे कोणीतरी दुःखात असू शकतं, या गोष्टीचीही आठवण ठेवली पाहिजे. जेव्हा कौतुकाचा वर्षाव होतो आणि पीडितेला विसरलं जातं, तेव्हा सत्य पुन्हा एकदा कुठेतरी नाहीसं झालं आहे, असं वाटू शकतं.”
या पोस्ट केल्यानंतर संध्या मृदुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे. संध्या तिच्या सशक्त आणि वास्तववादी अभिनयासाठी, तसेच बॉलिवूडमधील समांतर सिनेमा आणि सशक्त महिलाप्रधान भूमिकांसाठी विशेष ओळखली जाते. तिने ‘स्वाभिमान’, ‘कोशिश : एक आशा’ आणि ‘आशीर्वाद’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ओळख मिळवली होती. तसेच ती ‘झलक दिखला जा’ च्या दुसऱ्या सीझनची उपविजेती ठरली होती. याशिवाय तिने ‘साथियाँ’ (२००२) या चित्रपटात ‘दिना’ ही भूमिका साकारली जिचे खूप कौतुक झाले. ‘पेज ३’ (२००५) मधील ‘पर्ल सेक्वेरा’ या एअरहोस्टेसच्या भूमिकेसाठी तिला विशेष प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले. ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ (२००७) या कॉमेडी ड्रामा चित्रपटातील तिची भूमिका लोकप्रिय ठरली आणि २०१५ सालच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ‘ॲंग्री इंडियन गॉडेसेस’ या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली. अलीकडे ती ‘तांडव’ आणि ‘ताज: डिवाइडेड बाय ब्लड’ या प्रसिद्ध ओटीटी सीरिजमध्येही दिसली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या निधनाने नसीरुद्दीन शाह भावूक; खंत व्यक्त करत म्हणाले, ‘माझ्या मनात प्रचंड आदर होता पण…’
- विधान परिषदेच्या ५ जागांचे चित्र स्पष्ट: कोण कोणाविरोधात लढणार? कुठे झाली बंडखोरी?
- मेट्रो पूर्णपणे बंद करू नका, लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न; सु्प्रीम कोर्टाचे सरकारला आदेश
Quick Answers
संध्या मृदुलने प्रश्न उपस्थित केला की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अत्याचारी म्हटले जात नाही का आणि त्याने दिलेल्या वेदना गायब होतात का. पीडित व्यक्ती जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत त्या वेदनेसह जगते, असे सांगत तिने आपण नेहमीच पीडितेच्या पाठीशी उभे राहू असे स्पष्ट केले.
संध्याने लिहिले की एखाद्याच्या मरण्याने त्याने केलेले नुकसान पुसले जात नाही आणि जनतेच्या श्रद्धांजलीदरम्यान पीडितेसोबत घडलेली घटना कमी सत्य ठरत नाही. कोणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणे योग्य असले तरी, त्याच्याशी जोडलेल्या वेदनांमुळे कोणीतरी दुःखात असू शकते याची आठवण ठेवली पाहिजे.
या पोस्ट्स केल्यानंतर संध्या मृदुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे.
संध्या मृदुल ‘स्वाभिमान’, ‘कोशिश : एक आशा’ आणि ‘आशीर्वाद’ यांसारख्या मालिकांसाठी तसेच ‘साथियाँ’, ‘पेज ३’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ॲंग्री इंडियन गॉडेसेस’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









