Share

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम; पुणे ठप्प करण्याचा इशारा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला आहे.

Published On: 

Rohit Pawar on Junnar crime CM Fadnavis

प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण पुणे शहर ठप्प होऊ शकते, असा इशारा पवारांनी दिला. येत्या ७ किंवा ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या दिवशी जवळपास १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

सीजेपीचे अभिजीत दिपके यांच्या आवाहनाला पाठिंबा देताना पवार म्हणाले की, आंदोलक विद्यार्थी एकतर पुणे शहर बंद करतील किंवा थेट मुंबईत मंत्रालयावर धडक देतील. राज्य सरकार स्वतःच वेगळे आंदोलन उभे करत असून, सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला तडा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एमपीएससी आयोग बर्खास्त करण्याऐवजी संशयित सदस्यांना निलंबित करून चांगले अधिकारी आणावेत, असा पर्याय त्यांनी सुचवला. ‘एमपीएससी यंत्रणेच्या शुद्धीकरणाची गरज असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आक्रमक होऊ शकते आणि शहर ठप्प होऊ शकते,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावरही पलटवार केला. राणेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यापेक्षा आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, असा सल्ला पवारांनी दिला. नितेश राणे भविष्यात भाजप सोडतील आणि आमच्यासोबत आले तर आपण एकत्र मंत्री म्हणून राहू शकतो, असा दावाही रोहित पवार यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही