पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी रोखले; पोलिसांची मराठा आंदोलकांना मारहाण

Pankaja Munde । विद्यमान खासदार आणि बहीण प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना दिली आहे. त्यानंतर मुंडे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तिथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवत मराठा … Read more

Published On: 

Pankaja Munde । विद्यमान खासदार आणि बहीण प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना दिली आहे. त्यानंतर मुंडे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तिथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवत मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना त्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं होते. पंकजा मुंडे यांच्या गाडीच्या (Pankaja Munde) समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते.

आंदोलक मागे हटायला तयार नसल्याचे सांगत पोलिसांनी मराठा आंदोलकांना मारहाण केली आहे, लाठीमार करत आंदोलकांना बाजूला केले.

पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केला असल्याचीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात. त्यांना यावेळी डावलणे भाजपला जड गेले असते. दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा यांना मदत करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे फडणवीसांची गोची होणार होती, यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे लोकसभेची उमेदवारी देत ‘करेक्ट कार्यक्रम’ केला असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही