महायुतीला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेला उमेदवार मिळेना; अंबादास दानवे यांच्यावर दबावतंत्र

Chhatrapati Sambhajinagar Ambadas Danve On BJP Shivsena Eknath Shinde Group Leders Phone Latest Marathi News

Chhatrapati Sambhajinagar Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर । विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे ठाकरे गटाकडून लोकसभा लढण्यास तयार आहेत. पण ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे.

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात लोकसभा लढण्यावरून वाद आहे. काही दिवसापूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची माहिती अंबादास दानवे यांना देण्यात आली नव्हती, त्यामुळे दानवे यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी बोलून दाखवली.

दानवे म्हणाले,”  “चंद्रकांत खैरे नेहमीच संघटनेत मला डावलत आले. गेल्या 10 वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. तसेच, मी लोकसभेला खैरेंसाठी नाही, तर शिवसेनेसाठी काम करणार आहे.”

यावर चंद्रकांत खैरे यांनी उत्तर देत म्हणाले,””मी अंबादास दानवेंना कधीही डावललं नाही. डावललं असते तर ते विरोधी पक्षनेतेपदापर्यंत कधीही पोहोचले नसते. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत दानवेंनीच सांगितलं होतं की, मी त्यांचा राजकीय गुरू आहे.”

यावर उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत दानवे-खैरे वाद मिटवला आहे. त्यानंतर याच्याच आधार घेत पडद्यामागे महायुतीत मोठं राजकारण तापले आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत खैरे यांना आव्हन देणे सोपे नसणारअसल्याचे समोर आले आहे. अतुल सावे, संदीपान भुमरे, विनोद पाटील आणि भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच राजेंद्र जंजाळ हे हि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांचा प्रभाव फक्त त्यांच्या मतदार संघा पुरता मर्यादित आहे. मंत्री पद असूनही जिल्हात त्यांना हवे तसे विकासकामे करता आलेले नाही. शिवसेना फुटी नंतर संदीपान भुमरे यांना प्रसिद्धी मिळाली परंतु जनतेच्या मनात ठसा उमठवायला कमी पडले. भुमरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहे. उदा. बेकायदेशीर दारू विकी, विकास कामात टक्केवारी नातेवाईकांना कंत्राटे मिळून देणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत.

मराठा चेहरा म्हणून विनोद पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु, एका चॅनेलला दिलेल्या मुलाखती नंतर त्यांची प्रसिद्धी कमी झाली आहे. तसेच त्यांना मराठा समाजातूनच आता विरोध होत असून भाजपचा छुपा अजेंडा चालवत असल्याची चर्चा आहे.

भागवत कराड यांचे लोकसभेचे दुर्ष्टीने ठोस काही काम नाही. पंकजा मुंढे यांना तह देण्यासाठी कराड यांची राज्यसभेवर नियुक्ती फडणवीसांच्या सांगण्यावरून झाल्याचे बोलले जाते. उपमहापौर असलेले राजेंद्र जंजाळ हे हि गुडघ्याला बाशिंग बांधून शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. पण त्यांचा हि प्रभाव लोकसभा मतदार संघाच्या अंगाने कमी आहे.

महायुती कडून सर्व मुद्धे लक्षात घेतल्यांनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेच चंद्रकांत खैरे यांना तगडे आव्हान देऊ शकतात हे स्पष्ट आहे. त्यानुसार त्यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव टाकण्यात आहे, तसेच दानवे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन केले जात आहे. दानवे काही केल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला तयार नाही आहेत. महायुतीला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेला उमेदवार मिळवण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे.

शिंदे गटाकडून येणाऱ्या फोनला कंटाळून दानवे यांनी फोन बंद केले आहेत. फोन बंद करून अंबादास दानवे यांनी त्यांचे दौरा सुरू ठेवला असून आपण शिंदे गट किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

Ambadas Danve Join Eknath Shinde Shivsena?

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.